Ad will apear here
Next
मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान
सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण
पुणे :  नुकतीच दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला कोल्हापूरमधील १८ वर्षीय तरुण दुचाकी अपघातामुळे मेंदूमृत झाला. त्याचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान करण्यात आल्याने चार रुग्णांना नवजीवन मिळाले. 

मंगळवारी, ११ जून रोजी सकाळी ग्रीन कॉरिडॉरच्या साहाय्याने अवघ्या दोन तास २० मिनिटांत दात्याचे हृदय कोल्हापूरहून पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांच्या चमूने हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज यांच्या नेतृत्त्वाखाली भिगवण येथील ३० वर्षीय शेतकऱ्यावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण केले. हे डेक्कन येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दुसरे हृदय प्रत्यारोपण आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. मनोज दुराईराज म्हणाले, ‘कोल्हापूरमधील डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे एका १८ वर्षीय तरूणाला मेंदूमृत घोषित केल्याचे समजले. त्यानुसार डॉक्टरांचा चमू कोल्हापूरला रवाना झाला. पहाटे दोन वाजता तेथे पोहोचल्यानंतर या दात्याचे हृदय काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहाटे पाच वाजता हे ह्रदय घेऊन निघालेला डॉक्टरांचा गट ग्रीन कॉरिडॉरद्वारे अवघ्या दोन तास २० मिनिटांत पुण्याला पोहोचला. त्यानंतर तब्बल सहा तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे ३० वर्षीय शेतकऱ्यावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यात आले.’

हृदयप्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज यांच्या नेतृत्त्वाखालील डॉक्टरांच्या चमूमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. शंतनू शास्त्री, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजेश कौशिक, डॉ. तडस, हृदयभूलतज्ज्ञ डॉ. सुहास सोनवणे, डॉ. सौरभ बोकील, प्रशांत धुमाळ आदींचा समावेश होता. डॉ. स्वाती निकम यांनी समन्वयाचे काम पाहिले.

सह्याद्री हॉस्पिटल्सचे डॉ. केतन आपटे म्हणाले, ‘डेक्कन येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हे दुसरे हृदय प्रत्यारोपण आहे. पहिले हृदय प्रत्यारोपण मार्च महिन्यात झाले होते. दोन-तीन दिवसांपूर्वी सह्याद्रीच्या हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञांनी नागपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये मध्य भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण केले. प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती, या समितीच्या प्रमुख आरती गोखले, वाहतूक पोलिस, कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर यांच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे.’

मेंदूमृत तरुणाचे यकृत आणि मूत्रपिंड दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रुग्णांसाठी वापरण्यात आले. 

हेही जरूर वाचा :

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZSFCB
Similar Posts
एकाच यकृताने दिले दोघांना जीवदान; पुण्यात ‘स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट’ यशस्वी पुणे : स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट अर्थात एकाच ब्रेनडेड रुग्णाच्या यकृताचे दोन भाग करून त्यांचे दोन वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये प्रत्यारोपण करण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले आहे. पुण्यात पहिल्यांदाच झालेल्या या स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांटमुळे अनेकांना आशेचा किरण मिळाला आहे.
अवयदानामुळे पाच जणांना नवजीवन पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील एका मेंदू मृत महिलेचे अवयवदान करण्यात आल्याने पाच रुग्णांना जीवदान मिळाले. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातच ही अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
‘अवयवदानाने आठ, तर पेशीदानाने ५० व्यक्तींना मिळते जीवदान’ पुणे : ‘अवयवदानाची जनजागृती करणे आज खूप महत्त्वाचे आहे. अवयवदानाचे दोन प्रकार असतात. यात एक संपूर्ण अवयव आणि दुसरे पेशीदान. अवयवदानाने आठ, तर पेशीदानाने ५० लोकांचे जीव वाचू शकतात. अवयदानामध्ये दोन मूत्रपिंडे, यकृत, फुप्फुसे, हृदय आणि स्वादुपिंड या अवयवांचा समावेश होतो. अवयवातील एक पेशींचा समूह ज्याने तुम्ही ५० लोकांचे जीव वाचू शकतो
मरावे परि अवयवरूपी उरावे... पुणे : अपघातात ‘ब्रेनडेड’ झालेल्या एका ४० वर्षीय महिलेच्या हृदयाचे यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करून मुंबईतील एका महिलेचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये अवयव काढण्याची शस्त्रक्रिया पार पडली. मृत महिलेचे यकृत आणि दोन मूत्रपिंडे तिघांना दिल्याने त्यांना जीवदान मिळाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language